या श्लोकाचे स्मरण करून आपण आपले प्रत्येक कार्य समाधानाने, आनंदाने सिध्दिस जावे अशी मनोमन प्रार्थना करतो.या मनोभावे केलेल्या सकारात्मक विचारांतूनच आपला आत्मविश्र्वास दृढ होत असतो.साहजिकच केलेले कार्य उत्तम होते. हे कार्य विविध प्रकारचे असते. ते प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर ठरते. कुणाला पर्यटनाची, कुणाला गड- किल्ल्यांची, कुणाला वाचनाची, कुणाला खेळण्याची तर कुणाला विविध कलांची आवड असते. आपली आवड जोपासण्यासाठी व्यक्ती अनेक प्रकारांनी त्याचा वैविध्यतेचा शोध घेत असते. या शोधातूनच अनेक गोष्टी सापडतात,समजतात. ज्यांना पर्यटनाची आवड आहे. त्या व्यक्ती सातत्याने वेगवेगळी ठिकाणे शोधीत असतात. ठिकाण मिळाले तरी त्या जागी पोहचण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यात ती जागा, तिथे कसे पोहोचायचे तो मार्ग, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी साधने,त्यांची उपलब्धता,राहण्याची सुविधा, जेवण्याची सुविधा, तेथील पर्यटन बिंदू,स्थळे इ.माहिती असणे गरजेचे असते. जर आपल्याकडे सर्व माहिती उपलब्ध असेल तर आपला प्रवास सहज, सोपा व आनंददायी होण्यास मदत होते. असाच आनंददायी प्रवास अनुभवण्याची संधी आपल्याला Ashtavinayak.in या संकेतस्थळाला (Website) भेट देऊन अनुभवता येईल.
चला जाऊ या.. सहलीला...
चौसष्ट कलांचा अधिपती..
तुमचा आमचा गणपती..
चला दर्शना जाऊ या....
कार्य सिद्धीस जाण्या...
आशिर्वाद घेऊ या......
गणपती बाप्पा मोरया.....
अष्टविनायक यात्रेचा सोहळा पूर्ण करण्यासाठी, संपूर्ण यात्रेची
माहिती.....फक्त आणि फक्त तुमच्यासाठी..."Ashtavinayak.in"वर उपलब्ध.
Headmistress , Dnyanmandir vidyasankul,
Shri.K.R.Kotkar secondary & Higher secondary Vidyalay,
MIDC,Dombivli (East).
Tour Guide
Maharashtra State, Nashik City.